• Sat. Oct 25th, 2025

श्री विठ्ठल : २० लाख टन गाळप करेल : आमदार पाटील

Spread the love

श्री विठ्ठल कारखान्याचे मिल रोलर पूजन संपन्न

पंढरपूर
सर्व सभासदांनी विद्यमान संचालकावर विश्वास ठेवून कारखान्याची सुत्रे आमच्याकडे सोपविलेली आहेत. तेंव्हापासून ज्या ज्या वेळी आपणास बोलल्याप्रमाणे दिलेली सर्व अभ्यासने पाळलेली असून, यापुढेही आपल्या विश्वातास तडा जावू देणार नाही. तसेच येत्या गाळप हंगामात १५ लाख ते २० लाख मे.टना पर्यंत गाळप करण्याचा संचालक मंडळाचा प्रयत्न असेल, असे प्रतिपादन श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आ. भिजित पाटील यांनी केले.शुक्रवार (दि. २५ जुलै ) रोजी श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचा २०२५-२६ हंगामासाठी मिल रोलरचे पूजन संपन्न झाले. यावेळी कारखान्याच्या व्हाईस चेअरमन सौ. प्रेमलता रोगे, संचालक कालिदास साळुंखे, सिताराम गवळी व विठ्ठल रणदिवे, यांचे शुभहस्ते मिल रोलरचे पूजन करण्यात आले.

यावेळी बोलताना पाटील पुढे म्हणाले की, आपण पिकविलेल्या ऊसाची संपूर्ण नोंद देवून पुढील हंगामात आपले कारखान्याकडे ऊस गाळपास देवून सहकार्य करावे. मागील हंगामामध्ये गळीतास आलेल्या ऊसास २ हजार ८०३ रुपये प्रतिटन याप्रमाणे ऊसाची बिले, तोडणी व वाहतुकदार यांची कमिशनसह सर्व बिले अदा केली आहेत, तसेच सेवानिवृत्त कर्मचारी व मयत कर्मचारी यांचे फायनल पेमेंट ठरल्याप्रमाणे अदा केलेले आहे.

कामगारांची उर्वरीत थकीत देणी यावर तोडगा काढून टप्या टप्याने अदा करणेस संचालक मंडळ कटीबद्ध आहे. तसेच सन २०२५-२६ गळीत हंगामाचे नियोजन पूर्ण केलेने आहे. ऊस तोडणी वाहतूक ठेकेदारांना पहिला अ‍ॅडव्हान्स हप्ता अदा केलेला आहे व दुसरा हप्ता लवकरच अदा करीत आहोत. कारखान्याची ऑफ सिझनमधील दुरुस्ती व देखभालीचे कामे प्रगतीपथावर असून गळीत हंगामामध्ये कोणत्याही प्रकारच्या अडचणी येऊ नयेत या दृष्टीने सर्व खातेप्रमुखांनी कामकाज करुन घ्यावे, अशा सूचना देऊन कारखाना वेळेवर चालू करणेसाठी प्रयत्नशील राहावे, तसेच ही त्यांनी यात्रसंगी सांगितले.

सदर कार्यक्रम प्रसंगी कारखान्याचे जेष्ठ संचालक दिनकर चव्हाण, सचिन पाटील, तुकाराम मरके, प्रा. महादेव तळेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्र संचालन नितीन पवार यांनी केले. यावेळी प्रसंगी कारखान्याचे सर्व संचालक, कार्यकारी संचालक आर. बी. पाटील, जनरल मॅनेजर डी. आर. गायकवाड कारखान्याचे सर्व अधिकारी, कर्मचारी वर्ग, कार्यकर्ते, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *